Friday, May 3, 2024
Homeनाशिकचुकीच्या पद्धतीने झाडांची छाटणी

चुकीच्या पद्धतीने झाडांची छाटणी

नवीन नाशिक । New Nashik (प्रतिनिधी)

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नवीन नाशिक परिसरात काही वृक्ष कोलमडून पडल्याची घटना घडली.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर परिसरातील झाडांची छाटणी सुरू आहे. दरम्यान बर्‍याच ठिकाणी चुकीच्या पद्धतीने झाडांची छाटणी केली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नवीन नाशिक मधील एकदंत नगर येथील एक झाड छाटणीच्या नावाने बुंध्याजवळुन तोडल्याची घटना घडली आहे. झाडाच्या फांद्या छाटणी करणार्‍या लोकांवर प्रशासकीय अधिकार्‍यांनी लक्ष देणे गरजेचे असताना सर्रास पणे दुर्लक्ष केले जात आहे.

राणेनगर येथील प्रबोधनकार ठाकरे सभागृहाच्या आवारात एक झाड पडले होते. त्या झाडाच्या छाटणी दरम्यान संपूर्ण प्रांगणातील झाडांची चुकीच्या पद्धतीने छाटणी केल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे.

दरम्यान, परिसरात कुठेही झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू असतांना मनपा उद्यान विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींसह परिसरातील नागरीकांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या