Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशX New Features : आता X वर ऑडिओ-व्हिडिओ कॉलही करता येणार;...

X New Features : आता X वर ऑडिओ-व्हिडिओ कॉलही करता येणार; इलॉन मस्कची मोठी घोषणा… व्हॉट्सअ‍ॅपला आव्हान?

मुंबई | Mumbai

मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ‘X’ ((Micro blogging platform X)) वर नवीन व्हिडिओ, ऑडिओ कॉलिंगची सुविधा युजरसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याबाबत ‘X’ चे संचालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी नुकतीच याबाबत घोषणा केलीय. त्यांनी एका पोस्टमध्ये लिहिलंय की, लवकरच ‘X’ वर व्हिडिओसह ऑडिओ कॉलिंगची सुविधा युजरसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मस्क यांनी पुढं लिहिलंय की, हे फीचर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना कोणत्याही फोन नंबरची आवश्यकता नसणार नाही.

- Advertisement -

एलॉन मस्क, त्याच्या ॲपला सुपर ॲपमध्ये बदलण्याची योजना आखत आहेत. त्या दिशेनं त्यांनी आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. त्यांनी सांगितलं की, आता ‘X’ मध्ये व्हॉईससह व्हिडिओ कॉल फीचर युजरला वापरता येणार आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच हे फीचर आयओएस, अँड्रॉइड, मॅकसह पीसीवर काम करणार आहे. त्यासाठी कोणत्याही मोबाइल नंबरची गरज लागणार नाही, असं मस्क त्यांनी म्हटलं आहे. युजर आता WhatsApp, Instagram, Facebook ‘X’ सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ, ऑडिओ कॉल करू शकता. खुद्द एलॉन मस्क यांनी याबाबत माहिती दिली आहे. ही सुविधा X के iOS, Android, MAC आणि PC सर्व प्रकारच्या यूजर्सना मिळेल.

कॉलिंग फीचर आणून एलॉन मस्कचा मेटाला टक्कर देणार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कारण हे फीचर फक्त फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲपवर उपलब्ध होतं. मात्र आता ‘X’ वर देखील या फीचरची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. एलॉन मस्क यांनी पहिल्यांदा मे महिन्यात याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी त्यावेळी ट्विट केलं होतं की, ‘लवकरच आम्ही व्हिडिओसह ऑडिओ कॉलची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ‘X’ वरून जगात कुठेही कॉल करता येणार आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे हे फीचर वापण्यासाठी कोणत्याही फोन नंबरचीही गरज नसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या