सौ.पल्लवी चौधरी यांचीच बिनविरोध निवड होणार
यावल (प्रतिनिधी) –
यावल पंचायत समितीच्या सभापती पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जळगाव येथे ओबीसी महिला प्रवर्गातील राखीव पदासाठी आरक्षण निघाल्याने विद्यमान सभापती सौ.पल्लवी पुरुजीत चौधरी याच बिनविरोध या जागेसाठी निवडून येतील त्यामुळे भारतीय जनता पक्षाची याठिकाणी सत्ता राहील व उप सभापतीपदासाठी मात्र पुन्हा काँग्रेस व भाजपमध्ये रस्सीखेच होईल हे स्पष्ट झाले आहे.
पंचायत समितीच्या निवडणुकीच्या वेळी जनरल ओबीसी महिला आरक्षित पद निघाले होते त्यावेळी काँग्रेस व भाजपाकडे समसमान मते होती यावेळी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या सौ.संध्या किशोर महाजन यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज तत्कालीन सभापती पदाचे उमेदवार सौ.पल्लवी चौधरी यांच्याविरोधात बंड पुकारले होते.
त्यावेळी काँग्रेसच्या पाठिंब्यावर आणि दैवी चिठ्ठीने भाजपाचे उमेदवार पल्लवी चौधरी यांचा पराभव करून सौ.संध्या किशोर महाजन यांनी भाजपाचा विप झुगारुन सभापती पद मिळवले होते त्यावेळी भाजपातर्फे उच्च न्यायालयात दाद मागितल्यामुळे संध्या महाजन यांना चार ते पाचमहिन्यांमध्येच अपात्र ठरविण्यात आले होते.
या रिक्त जागी सौ.पल्लवी चौधरी यांनी सभापती पदाचा पदभार निवडणुकीत स्वीकारला होता त्या दिवसापासून संध्या किशोर महाजन या दहीगाव गणातून अपात्र झाल्याने जागा रिक्त आहे. याबाबत हायकोर्टामध्ये निकाल अद्याप आलेला नाही तर लताबाई भगवान कोळी या सांगवी खुर्द पंचायत समितीत गणातून एस.टी.महिला या जागेवरून निवडून आलेल्या होत्या.
मात्र त्यांना निवडणुकीनंतर सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्या गेल्याने याबाबत पंचायत समिती काँग्रेस गटनेता शेखर सोपान पाटील यांच्या तक्रारीनुसार अपात्र घोषित करण्यात आलेले आहे त्यामुळे काँग्रेस व भाजपा कडे समसमान आज चार चार सदस्य आहेत आता आरक्षण महिला ओबीसी राखीव प्रवर्गातील निघाल्याने भाजपाच्या गटात सौ.पल्लवी चौधरी याच उमेदवार असल्याने त्यांचा आता सभापतीपदाच्या पुढील कार्य काळ हा अबाधितच राहणार आहे मात्र काँग्रेसच्या पारड्यात गेलेले उपसभापतीपदी उमाकांत रामराव पाटील यांच्या जागेवर आता निवडणूक झाल्यास पुन्हा भाजप आणि काँग्रेसमध्ये उपसभापती पदासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता येणाऱ्या कालखंडात येत्या आठ दिवसात आणखी काय खेळी केली जाते याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे