Sunday, November 24, 2024
Homeनाशिकमाझी वसुंधरा अभियानात येवला नगरपरिषद विभागात द्वितीय; 'इतक्या' लाखांचे पारितोषिक

माझी वसुंधरा अभियानात येवला नगरपरिषद विभागात द्वितीय; ‘इतक्या’ लाखांचे पारितोषिक

येवला प्रतिनिधी | Yeola
पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने पृथ्वी जल वायू आणि आकाश या पंचतत्वावर आधारित माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये येवला नगरपरिषदेने नाशिक विभागात द्वितीय क्रमांक पटकावला असून शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठी केलेली कामे त्यात ठेवलेले सातत्य याच्या जोरावर येवला नगरपरिषदेने ही किमया साधली आहे.

राज्य शासनाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान हे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी २ ऑक्टोबर 2020 पासून राबविण्यात येत आहे शहरी तथा ग्रामीण अशा दोन्ही गटात ते आहे यामध्ये निसर्गाच्या पंचतत्वावर आधारित उपक्रम आहेत. यावर्षीचा अभियानाचा चौथा टप्पा होता. येवला नगरपरिषद पहिल्या टप्प्यापासून यात सहभागी असून सलग चौथ्या वर्षी देखील या अभियानात मोलाची कामगिरी येवला नगरपरिषदेने केली आहे. मागील वर्षी अभियानात महाराष्ट्रात पंधरावा क्रमांक आला असून विभागात प्रथम क्रमांक होता तर ह्या वेळेस महाराष्ट्रात सतरावा तर विभागात द्वितीय क्रमांक आला असून व ५० लाखाचे बक्षीस या ठिकाणी मिळवले. या अभियानात वर्षभरातील कामाचा आढावा घेऊन त्याचा अहवाल तयार केला जातो त्यानंतर प्रत्यक्ष संस्थेद्वारे मूल्यमापन होत असते. दरम्यान, पालिकेला विभागीय स्तरावर द्वितीय क्रमांकच ५० लाख हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल येवला नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तुषार आहेर यांनी कौतुक केले.

- Advertisement -

सदर अभियानासाठी स्वच्छता व पाणीपुरवठा अभियंता सुमित काळोखे स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, माझी वसुंधराचे नोडल अधिकारी गोविंद गावंडे, शहर समन्वयक गौरव चुंबळे, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रकल्प अधिकारी शितल शेळके, स्वच्छ भारत अभियान प्रकल्प अधिकारी संदीप बोढरे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच उपमुख्यधिकारी चंद्रकांत भोये, रोहित पगार, शिवशंकर सदावर्ते, हाडके, किरण अहिरे, आदित्य मुरकुटे, सुषमा विखे, राहुल पाटील, राजेश निकम, विजय शिंदे, प्रभाकर वाघ, ब्रँड अँबेसिडर श्रीकांत खंदारे, अविनाश शिंदे व सर्व पर्यावरण दूत व सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे देखील विशेष सहकार्य लाभले.

हे सांघिक प्रयत्नांचे यश असून माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत येवला नगर परिषदेने विभागास्तरावर द्वितीय क्रमांकाचे 50 लाखाचे बक्षीस मिळवले हे नक्कीच कौतुकास्पद असून यापुढेही देखील येवला नगरपरिषद माझी वसुंधरा 5.0 मध्ये राज्यात पहिल्या तीन मध्ये येण्यासाठी प्रयत्न करेन त त्यासाठी येवला शहरातील स्वच्छता दूत पर्यावरण दूत व पर्यावरण प्रेमी, नागररिकांचे सहकार्याची अपेक्षा करतो
-तुषार आहेर, मुख्याधिकारी येवला नगरपरिषद येवला

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या