Saturday, October 17, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : तरणतलावात बुडून तरूणाचा मृत्यू

दुर्दैवी : तरणतलावात बुडून तरूणाचा मृत्यू

मनमाड | प्रतिनिधी Manmad

- Advertisement -

येथून जवळ येवला रोडवर असलेल्या एका हॉटेलच्या तरणतलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मनमाड पोलिस ठाण्यात याची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद घेण्यात आली आहे.

गणेश गायकवाड (रा. नाशिक) असे या तरुणाचे नाव आहे. तो नाशिक येथून विवाह सोहळ्यासाठी येथे आला होता. तो सायंकाळी शहरालगत असलेल्या एका हॉटेलच्या तरणतलावात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता. पोहताना अचानक तो पाण्यात बुडू लागल्याचे पाहून त्याला त्याच्यासोबतच्या मित्रांनी बाहेर काढले. त्याला वाहनातून हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना शहरातून जाणार्‍या पुणे-इंदूर महामार्गांवर झालेल्या वाहतुकीची प्रचंड कोंडीत कार अडकल्यामुळे काही तरुणांनी गणेशला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल गाठले मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

वाहतुकीच्या कोंडीमुळे गणेशला वेळेवर उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे त्याचा जीव गेल्याची शहरात चर्चा आहे. गणेशचा मृत्यू हृदय विकाराच्या धक्क्याने झाला की पाण्यात बुडून याचा उलगडा शवविच्छेदनाच्या अहवाला नंतर होईल. मात्र जर गणेशला घेऊन जाणारे वाहन वाहतुकीचीच्या कोंडीत अडकले नसते तर त्याचा जीव वाचला असता असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात...