Monday, September 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकार अपघातात तरुणाचा मृत्यू

कार अपघातात तरुणाचा मृत्यू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

कश्यपी धरणाकडून नाशिककडे येत असणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सार्थक भगवान रहाणे (24 ,अशोक नगर सातपूर नाशिक ) हा (दि.३ ) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याच्या अल्टो कारने कश्यपी धरणा कडून नाशिककडे जात असताना कश्यपी हॉटेल जवळ साडगाव शिवार (ता. जि. नाशिक ) येथे त्याची अल्टो कार ही रोडवरील मोरीच्या कठड्यावर जाऊन आदळली, यावेळी अपघात झाल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याला दुखापत झाली.

यावेळी त्याचा चुलत भाऊ हरीश चंद्रकांत रहाणे याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे हवलदार आर.के. पगारे व पोलीस शिपाई अमोल गांगुर्डे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या जनरलच्या 7 जागा बिनविरोध होण्याची शक्यता

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद होत असताना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मात्र राजकीय वातावरण तापण्याआधीच समझोत्याचे सूर उमटू लागले आहेत. रविवारी संगमनेर...