Tuesday, September 29, 2026
Homeक्राईमSuicide News : धमकी व मानसिक छळामुळे युवतीची आत्महत्या

Suicide News : धमकी व मानसिक छळामुळे युवतीची आत्महत्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

तरूणाच्या मानसिक त्रासाला कंटाळून युवतीने आत्महत्या केली. वैष्णवी गणेश घोरपडे (वय 24 रा. नागरदेवळे, ता. अहिल्यानगर) असे मयत युवतीचे नाव आहे. या प्रकरणी तरूणाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषी फुंदे (पूर्ण नाव माहिती नाही, मुळ रा. सोनानगर, अहिल्यानगर, सध्या रा. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे.

- Advertisement -

मृत तरूणीचे वडील गणेश लिंगाप्या घोरपडे (वय 49 रा. नागरदेवळे) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना 9 जून रोजी रात्री 11:45 वाजण्याच्या सुमारास घडली. वैष्णवी हिने इंद्रप्रस्थ कॉलनी येथील राहत्या घरी छताला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन जीवन संपवलं. ऋषी फुंदे याने वैष्णवीवर दीर्घकाळापासून मानसिक दबाव टाकला होता. त्याचे स्वतःचे लग्न झालेलं असूनही, तो वैष्णवीला वारंवार फोन व व्हॉट्सअ‍ॅपव्दारे संपर्क करून अश्लिल भाषेत धमक्या देत होता.

इतकंच नव्हे तर, तिचे आई-वडील व भावाला ठार मारण्याची धमकीही दिली होती. या सातत्याने होणार्‍या मानसिक छळामुळेच वैष्णवीने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतल्याचे फिर्यादीत स्पष्ट करण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक इंगळे अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय! ‘माजी अग्निवीरांना’ शासकीय नोकरीत १०% आरक्षण, वैरण...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची अत्यंत महत्त्वाची बैठक आज मुंबईतील मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील युवक, शेतकरी,...