Tuesday, February 3, 2026
Homeनगरराहुरी फॅक्टरी येथे तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या

राहुरी फॅक्टरी येथे तरूणीची गळफास घेऊन आत्महत्या

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे राहत असलेल्या आणि बीएससीचे शिक्षण घेणार्‍या तरुणीने 19 जुलै रोजी, दुपारी राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. वैष्णवी सचिन म्हसे (वय 23) ही तरुणी राहुरी फॅक्टरी येथील समर्थनगर येथे तिच्या कुटुंबासह राहत होती.

- Advertisement -

ती बीएससीचे शिक्षण घेत होती. तिने दुपारच्या सुमारास घरात कोणी नसताना घराच्या छताच्या लोखंडी अँगलला दोरी बांधून गळफास घेतला. वैष्णवीची आई दुपारी 1.30 वाजता घरी गेली असता घराचा दरवाजा आतून बंद होता. बराच वेळ आवाज दिला, मात्र वैष्णवीने दरवाजा उघडला नाही. परिसरातील काही तरुणांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता वैष्णवी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. वैष्णवीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून ताबडतोब राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले.

YouTube video player

मात्र वैद्यकीय अधिकारी शिरसागर यांनी वैष्णवीला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. वैष्णवीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी केली होती. वैष्णवीने कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे मात्र समजू शकले नाही. या बाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....