अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शहर व परिसरातून दोन युवतींसह एका युवकाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याच्या तीन वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन तर, अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात एक असे तीन स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले असून पोलिसांकडून अपहृतांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेची फिर्याद शनिवारी (31 ऑक्टोबर) सायंकाळी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. भिंगार, आलमगीर परिसरात राहणार्या 37 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. त्यांची 19 वर्षीय भाची अहिल्यानगर शहरातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. शनिवारी सकाळी 11 वाजता ती कॉलेजला गेली होती. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून अपहरण केल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. याबाबत पीडित युवतीचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर देखील तिचा शोध न लागल्याने सायंकाळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील केडगाव परिसरात घडली.
38 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1.45 वाजण्याच्या दरम्यान त्यांच्या 19 वर्षीय मुलीला राहत्या घरातून अज्ञात व्यक्तीने आमिष दाखवून पळवून नेले. याप्रकरणी 31 ऑक्टोबर रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, निमगाव वाघा (ता. अहिल्यानगर) येथील सविता सुरेश फलके (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा सचिन फलके (वय 21) याचे शुक्रवारी (29 ऑक्टोबर) रात्री अज्ञात व्यक्तीने कायदेशीर रखवालीतून अपहरण केले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाआहे.




