Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमविरोधात तक्रार दिल्याच्या रागातून तरूणावर हल्ला

विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून तरूणावर हल्ला

वाडिया पार्कच्या मैदानावरील घटना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विरोधात तक्रार दिल्याच्या रागातून पाच जणांच्या टोळक्याने तरूणाला मारहाण करून शस्त्राने हल्ला केला. हल्ल्यात तरूण जखमी झाला आहे. सुनील लक्ष्मण कोडम (वय 35 रा. श्रमिकनगर, भिस्तबाग नाका, सावेडी) असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

राजेंद्र बोगा, प्रणव राजेंद्र बोगा, संजय बोगा, विनोद बोगा (पूर्ण नावे नाहीत, सर्व रा. पंचरंग गल्ली, तोफखाना) व एक अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी (दि. 19) दुपारी सुनील कोडम वाडिया पार्क येथील मैदानावर क्रिकेटचा सामना पाहत असताना संजय बोगा याने ‘तु आमचे विरोधात तक्रार का देतो’ असे म्हणून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

YouTube video player

त्यानंतर तेथे राजेंद्र बोगा, प्रणव बोगा, विनोद बोगा व एक अनोळखी व्यक्ती आले व त्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर सुनील यांना वाडिया पार्क मैदानाच्या गेटवर नेले. तेथे गेल्यावर एकाने शस्त्राने डोक्यात व मानेवर हल्ला करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार राजेंद्र औटी करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : नात्यागोत्यांचा भरला मेळा! मनपाची निवडणूक ठरतेय...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik महानगरपालिकेच्या प्रचार निवडणुकीचा (Nashik Municipal Election) दिवसेंदिवस अधिकच रंगतदार होत असून, यंदाची निवडणूक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. यंदाच्या...