Sunday, November 1, 2026
Homeनगरतरुणाला चावा घेत केली मारहाण

तरुणाला चावा घेत केली मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अपार्टमेंटमध्ये आलेल्या एका अनोळखी व्यक्तीस येथे कोणाकडे आला, अशी विचारणा केल्याचा राग आल्याने संबंधित व्यक्ती आणि महिलेने अपार्टमेंटमधील फ्लॅटधारकास चावा घेत मारहाण केली. शहरातील सातभाई गल्लीमध्ये शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एका महिलेसह अनोळखी व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अमृत सतीश रासने (वय 35 रा. आयोध्या अपार्टमेंट, सातभाई गल्ली) यांनी फिर्याद दिली आहे. अमृत हे इलेक्ट्रिकलचे काम करतात. ते शनिवारी सायंकाळी कामावरून घरी येत होते. त्यावेळेस अपार्टमेंटमध्ये एक अनोळखी व्यक्ती आलेला होता. या व्यक्तीला येथे कोणाकडे आले असे विचारले असता. त्या अनोळखी व्यक्तीला त्याचा राग आला व तो शिवीगाळ करू लागला. अपार्टमेंट मधील एक महिलाही खाली आली.

या दोघांनी मिळून अमृत यांना शिवीगाळ करत मारहाण केली. महिलेने अमृत यांना चावा घेत जखमी केले. त्यावेळेस त्यांची पत्नी तृप्ती ही मदतीसाठी आली. अमृत यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अपार्टमेंटमधील एक महिला आणि अनोळखी व्यक्ती यांच्याविरूध्द मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

आदिवासी कला-संस्कृतीचा नाशिकमध्ये जागर; ‘भगवान बिरसा कला संगम २.०’ला प्रारंभ

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik आदिवासी कला, संस्कृती आणि परंपरेचा समृद्ध वारसा जपण्यासोबतच तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश देत ‘भगवान बिरसा कला संगम २.०’च्या नाशिक विभागीय...