Friday, May 3, 2024
Homeनाशिकभावली परिसरात धबधब्यात पडलेल्या 'त्या' तरुणाचा मृतदेह सापडला

भावली परिसरात धबधब्यात पडलेल्या ‘त्या’ तरुणाचा मृतदेह सापडला

इगतपुरी । Igatpuri

तालुक्यातील भावली धरणाच्या (Bhavli Dam) बॅकवॉटर परिसरात (Backwater area) आंघोळीसाठी गेलेला तरुण सुनिल सोनु सांगळे हा पाण्याचा (water) अंदाज न आल्याने वाहून जात धबधब्यातुन २५० फुट खोल दरीत पडल्याची घटना रविवार (दि.२४) रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. त्यानंतर अखेर आज (दि. २५) रोजी सकाळी ११:३० वाजता या तरुणाला शोधण्यास इगतपुरी प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन (Administration and Disaster Management) टीमला यश आले असुन जवळपास २५० फुट खोल दरीत पडल्याने हा तरुण मृत अवस्थेत आढळला…

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी की, इगतपुरी जवळ असणाऱ्या एका बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून सुनील सोनू सांगळे (Sunil Sonu Sangle) हा काम करतो. त्याच्यासोबत काम करणारे त्याचे इतर सहकारी सुहास जगताप, ऋषिकेश गावले, दिनेश पंडित यांच्यासोबत जवळ असणाऱ्या जांमुंडे गावाच्या (Jamunde village) परिसरात जेथे भावली धरणाचे बॅकवाॅटर आहे त्या ठिकाणी दुपारच्या सुमारास आंघोळीसाठी गेले होते. यापैकी सुनील सोनू सांगळे याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला होता.

या घटनेची माहिती समजताच तहसीलदार परमेश्वर कासुळे (Tahsildar ParmeshwarKasule) यांनी तातडीने कसारा (kasara) येथील आपत्ती व्यवस्थापन टीमचे प्रमुख शाम धुमाळ यांना आणि इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या पथकाला तातडीने कळवुन घटनास्थळी पाचारण केले. या दोन्ही टीमने शोधकार्य सुरु केले मात्र आज पाऊस जास्त असल्याने पाण्याचा जोर वाढत असल्याने रात्री ऊशिरा पर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही.

मात्र आज सकाळी सहा वाजताच तहसिलदार परमेश्वर कासुळे यांनी जिल्हयातील चांदोरी (chadori) येथील दोन बोट व चार जलतरण पाणबुडे व आपत्ती व्यवस्थापन टीम यांच्या मदतीने सकाळी सहा वाजेपासून धरण परिसरात शोध मोहिम सुरू केली. अखेर धरणाच्या नदी पात्रात वाहुन गेलेला सुनिल सांगळे दोनशे फुट खोल दरीत झुडपांमध्ये मयत अवस्थेत आढळुन आला. त्याला बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य आवजी आगिवले, सोनू वीर व अन्य दोन जण मदतीला होते. तसेच मयत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी भावली भागातील जनावरे चारणाऱ्या युवकांनी मदत केल्याने या सर्व टीमला यश आले.

दरम्यान, रविवारी दुपारी चार मित्रांच्या सोबत पोहत असतांना धरणात सुनिल बुडाल्याने मित्रांनी त्याला वाचविण्याचा खुप प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही.अखेर प्रशासन व आपत्ती टीम व स्थानिक गुराखी यांच्या मदतीने आज (सोमवारी) या तरुणाला शोधणे शक्य झाले. तरूणाला शोधण्यासाठी तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी विशेष प्रयत्न केल्याने अति खोल दरीतुन या तरुणाचा मृतदेह काढण्यात यश आले. परिसराची माहिती असल्याशिवाय पर्यटकांनी अततायीपणा करू नये असे आवाहन तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या