
नांदगाव | प्रतिनिधी Nandgaon
भरधाव वेगात जाणार्या ट्रकखाली सापडून २४ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नांदगावकडून येवल्याकडे जाणारा एच.आर.-५५-ए.एच.-३२२९ या ट्रकने जलकुंभाजवळ उभ्या असलेल्या सुनिल राजू साठे (२४) या तरूणास धडक दिली. तो ट्रकखाली सापडून जागीच ठार झाला. मिरवणुकीच्या बंदोबस्तावरील पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सुनिल याला रूग्णालयात दाखल केले मात्र तो उपचारापुर्वीच मयत झाल्याचे वैद्यकिय सुत्रांनी सांगितले.
मिरवणुकीच्या उत्साहात यामुळे काहीसे विघ्न आले. पोलिसांनी या संदर्भात अपघातानंतर वाहन जागेवर सोडून पसार झालेल्या ट्रक चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




