Thursday, March 13, 2025
Homeक्राईमचॉपर, कोयत्याने हल्ला करून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

चॉपर, कोयत्याने हल्ला करून युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

कन्स्ट्रक्शन साईटवर गांजा ओढण्यास विरोध केल्याचे कारण || चौघांवर गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

कन्स्ट्रक्शन साईटवर गांजा ओढण्यास विरोध केल्याच्या रागातून सेक्युरीटी गार्डचे काम करणार्‍या युवकावर चॉपर व कोयत्याने हल्ला करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. करण संतोष कदम (वय 19 रा. टाकळी खातगाव, ता. नगर) असे त्या युवकाचे नाव असून तो हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान, त्यांनी उपचारादरम्यान पोलिसांना दिलेल्या जबाबावरून एका महिलेसह चौघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल साबळे, यश शिरसाठ, नयन पाटोळे (पूर्ण नावे नाहीत, सर्व रा. गांधीनगर, बोल्हेगाव) व एक अनोळखी महिला यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. करण व त्यांचे वडिल संतोष बोल्हेगाव उपनगरातील भंडारी कन्स्ट्रक्शन येथे सेक्युरीटी गार्ड म्हणून ड्यूटी करतात. सोमवारी सायंकाळी सात ते मंगळवारी सकाळी सात पर्यंत त्या दोघांना ड्यूटी होती. सोमवारी सायंकाळी सात वाजता ते दोघे ड्युटीवर आले. आठ वाजता करण जेवण करत होते तर त्यांचे वडिल संतोष हे कन्स्ट्रक्शन साईटवर फेरफटका मारण्यासाठी गेले होते. तेवढ्यात दोन अनोळखी इसम व एक महिला तेथे आली.

ते करणला म्हणाले, ‘आम्हाला गांजा प्यायचा आहे तरी आम्हाला पिण्यासाठी पाणी दे’, तेव्हा करण त्यांना म्हणाले ‘येथे गांजा ओढू नका येथून निघून जा’ असे म्हणताच त्यांना राग आला. त्यांनी करणला शिवीगाळ करून मारहाण केली. काही वेळाने त्यांचा साथीदार तेथे आला. त्या सर्वांनी मिळून करणवर चॉपर, कोयता व दगडाने हल्ला करत त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. हल्ल्यात करण गंभीर जखमी झाले. त्यांचे वडिल संतोष घटनास्थळी येताच ते चौघे तेथून निघून गेले. जखमी करण यांना उपचारासाठी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. उपचारादरम्यान त्यांनी पोलिसांना जबाब दिला. त्यावरून मंगळवारी रात्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. करण यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले असून गुन्ह्याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...