अहमदनगर|Ahmedagar
हाणामारीत (Beating) एका तरूणाचा खून (Youth Murder) झाला. जावेद गणीभाई तांबोळी (वय 35 रा. वाळकी) असे खून (Murder) झालेल्या तरूणाचे नाव आहे. नगर तालुक्यातील वाळकी (Walki) गावामध्ये रविवारी दुपारी ही घटना घडली. दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे (Nagar Taluka Police Station) प्रभारी सहायक निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी दिली.
वाळकी (Walki) येथे रविवारी दुपारी जावेद तांबोळी यांच्यासोबत इतर दोघांचे वाद (Dispute) झाले. या वादातूनच जावेद याला मारहाण झाली. यात तो गंभीर जखमी (Injured) झाले. घटनेनंतर त्याला नगर येथे उपचारासाठी घेऊन येत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस (Nagar Taluka Police) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेची प्राथमिक चौकशी करत दोघांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान जावेद याचा नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला होता, याबाबत अद्यापपर्यंत माहिती समोर आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या संदर्भात तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत.




