Wednesday, February 19, 2025
Homeक्राईमझेंडीगेटच्या दोन कत्तलखान्यावर एलसीबीचे छापे

झेंडीगेटच्या दोन कत्तलखान्यावर एलसीबीचे छापे

12 जणांना पकडले || 24 लाख 57 हजारांचा मुद्देमाल ताब्यात

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रविवारी सकाळी अहिल्यानगर शहरातील झेंडीगेट परिसरामध्ये सुरू असलेल्या दोन कत्तलखान्यांवर छापेमारी केली. एकूण 12 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून जिवंत जनावरे, गोमांस, वजन काटा, सूरा व मोबाईल असा एकूण 24 लाख 57 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक राकेश ओला व गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी सकाळी आठच्या सुमारास झेंडीगेट परिसरामध्ये अरबाज गुल्लु कुरेशी (रा. झेंडीगेट) याच्या घराच्या पाठीमागील बाजुस सुरू असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला. तेथे इरफान एजाज कुरेशी (वय 38, रा. झेंडीगेट) व रफिकउल जुनाब परामल (वय 28, रा. बाबा बंगाली, झेंडीगेट) हे दोघे मिळून आले. त्यांच्या ताब्यातून तीन हजार 20 किलो गोमांस, इलेक्ट्रीक काटा, लोखंडी सुरा असा एकूण नऊ लाख नऊ हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता अरबाज गुल्लु कुरेशी व निहाल इस्माईल कुरेशी (रा. झेंडीगेट) यांच्या सांगण्यावरून जनावरांची कत्तल करत असल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पथकाने 22 नंबर मस्जीद समोर, व्यापारी मोहल्ला येथे छापा टाकला असता आठ जण गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले. यामध्ये तौसीफ सादीक कुरेशी (वय 34), इरफान फारूक कुरेशी (वय 38), समत बाबुलाल कुरेशी (वय 47), शफिक नूर कुरेशी (वय 60), फिरोज फारूक कुरेशी (वय 32), अरकान अशिफ कुरेशी (वय 21), सादिक गुलामनबी कुरेशी (वय 40), शहारिक रशीद कुरेशी (वय 30 सर्व रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, अहिल्यानगर) यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून जनावरे, गोमांस, वजन काटा, लोखंडी सुरा व पाच मोबाईल असा 15 लाख 48 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

आठ जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, अतुल लोटके, विजय ठोंबरे, संतोष खैरे, राहुल सोळंके, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रवींद्र घुंगासे, रोहित येमुल, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे व महादेव भांड यांच्या दोन पथकांनी ही कारवाई केली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या