Tuesday, February 3, 2026
HomeनगरAhilyanagar : जि.प. आणि पं.स. निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

Ahilyanagar : जि.प. आणि पं.स. निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई / अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नगरसह राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग रचना, झेडपी अध्यक्ष आरक्षण आणि पं. स. समिती सभापती आरक्षणानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार अंतिम आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 27 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाईल. गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व 14 पंचायत समितीच्या निवडणुकीची प्रतिक्षा आहे.

- Advertisement -

दरम्यान, आधी गट आणि गणाची सुधारित प्रभाग रचना त्यानंतर अध्यक्ष पदाचे आणि पंचायत समितीच्या सभापती पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहेत. या विरोधात न्यायालयीन लढाईनंतर राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी मतदार यादी कार्यक्रम जाहीर केला आहे. यामुळे रखडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या दृष्टीने हे पहिले पाऊल मानले जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीसाठी 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे.

YouTube video player

जिल्हा परिषद निवडणूक विभाग आणि पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर 14 ऑक्टोबर 2025 पर्यंत हरकती आणि सूचना दाखल करता येतील. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचा निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्यांचा अंतिम व अधिप्रमाणित करून मतदार याद्या व मतदान केंद्र यांची यादी प्रसिध्द करणार आहेत. त्यानंतर साधारण लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर होवून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.

निवडणूक विभाग आणि निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या तयार करताना विधानसभा मतदारसंघाच्या यादीप्रमाणेच मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे आणि पत्ते कायम ठेवले जातात. या याद्यांमध्ये नवीन नावांचा समावेश करणे, नावे वगळणे अथवा नावे किंवा पत्त्यांमध्ये दुरूस्ती करणे इत्यादी स्वरूपाची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाकडून केली जात नाही. हरकती आणि सूचनांच्या अनुषंगाने केवळ मतदार याद्यांचे विभाजन करताना लेखनिकांकडून होणार्‍या चुका, मतदाराचा चुकून निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गण बदलणे, विधानसभेच्या यादीत नाव असूनही प्रभागाच्या यादीत नाव नसणे आदींसंदर्भातील दुरूस्त्या हरकीत आणि सूचनांच्या अनुषंगाने करण्यात येतात, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या सुचना
विधानसभा मतदार यादीत संबंधीत निवडणूक विभाग व निर्वाचक गण क्षेत्रात समाविष्ट असलेल्या एकूण मतदारांची संख्या आणि संबंधीत निवडणूक विभाग व निर्वाचक गणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील मतदारांची एकूण संख्या समान आहे की नाही याची खातरजमा प्रत्येक जिल्हा प्रशासनाने करावी जेणे करून प्रत्येक गट आणि गणात एकही मतदार सुटणार नाही याची दक्षता घ्यावी. यासह दुबार नावे, मतदार यादीतील बदल, नवीन नावांचा समावेश करणे, नाव वगळणे, नावातील दुरूस्ती व पत्यांमधील दुरूस्ती आदीबाबत या आदेशात सुचना देण्यात आलेल्या आहेत.

असा आहे जिल्ह्याचा तपाशील

  • निवडणुकीसाठी 23 हजार 605 मनुष्यबळाची गरज
  • जिल्हा परिषदेसह 14 पंचायत समित्यांसाठी निवडणूका होणार
  • 2024 च्या विधानसभा निवडणुकीनूसार जिल्ह्यात 29 लाख 74 हजार 18 मतदार
  • 1 जुलै 2025 नूसार जिल्ह्यात 30 लाख 6 हजार 816 मतदार
  • 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 3 हजार 132 मतदान केंद्र
  • आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यात 3 हजार 705 केंद्र प्रस्तावित

असा आहे कार्यक्रम
8 ऑक्टोबरला गट आणि गणाची प्रारूप मतदार यादी प्रसिध्द होईल.
– त्याच दिवसापासून 14 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करता येतील
– 27 तारखेला अंतिम गट आणि गणनिहाय मतदार यादी व मतदान केंद्राची यादी प्रसिध्द होणार आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला काय मिळतोय भाव?

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata मंगळवारी राहाता बाजार समिती (Rahata Market Committee) कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1400 रुपये भाव मिळाला. कांद्याची 3634 गोण्यांची आवक झाली. कांदा...