न्हावी Nhavi ता यावल वार्ताहर-
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी Zilla Parishad Chief Executive Officer डॉ . पंकज आशिया Dr. Pankaj Asia यांनी न्हावी Nhavi प्र यावल ग्रामपंचायतीला Gram Panchayat आठ डिसेंबर रोजी गुरुवारी संध्याकाळी भेट दिली. या ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा My Earth या योजनेमध्ये सहभाग घेतला असल्यामुळे या गावातील विविध विकास कामांची त्यांनी पाहणी केली. विकास कामांची पाहणी करत असताना गांडूळ खत प्रकल्प earthworm project प्रत्यक्ष जागेवर जाऊन बघितला.
गांडूळ प्रकल्पाला भेट देऊन माझी वसुंधरा अंतर्गत केलेल्या विकास कामाबद्दल सरपंच भारती चौधरी Sarpanch Bharti Chaudhary यांनी त्यांना सविस्तर माहिती दिली.
त्यानंतर डॉ.पंकज आशिया यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला मार्गदर्शन करून काही महत्वाच्या सूचना केल्या. तत्पूर्वी सर्व मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सरपंच भारती चौधरी व मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शरद महाजन, उपसरपंच उमेश बेंडाळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बी.डी.ओ.डॉ. मंजुश्री गायकवाड ,शिक्षण विस्तार अधिकारी हबीब तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, तालुका कोऑर्डिनेटर चेतन चौधरी ,माजी उपसरपंच नितीन चौधरी, ग्रा.प.सदस्य यशवंत तळेले व ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर जयंकार उपस्थित होते.




