Saturday, July 25, 2026
Homeक्राईमAhilyanagar : बारावी परीक्षेच्या शुल्काचा अपहार; लिपिकाविरूध्द गुन्हा दाखल

Ahilyanagar : बारावी परीक्षेच्या शुल्काचा अपहार; लिपिकाविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

विद्यार्थ्यांकडून बारावी बोर्डाच्या एटीकेटी परीक्षेचे शुल्क घेऊन ते संबंधित मंडळाकडे जमा न करता अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर शहरातील गांधी मैदान परिसरातील प्रगत विद्यालयात उघडकीस आला आहे. या प्रकरणी विद्यालयाचा लिपिकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

लुहाण लक्ष्मण पहिलाजरॉय (वय 48) असे गुन्हा दाखल झालेल्या लिपिकाचे नाव आहे. याबाबत सर्जेपुरा येथील किराणा व्यावसायिक अमोल टिल्लू गायकवाड (वय 42) यांनी मंगळवारी (16 जून) फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, संशयित आरोपी लिपिक लुहाण पहिलाजरॉय याने फिर्यादींच्या मुलासह इतर चार विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून बारावी बोर्डाच्या एटीकेटी परीक्षेसाठी आवश्यक असलेले शुल्क रोख स्वरूपात स्वीकारले होते. विद्यार्थ्यांच्या परीक्षेची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ही रक्कम ऑनलाइन पध्दतीने मंडळाकडे जमा करणे आवश्यक होते.

मात्र, संशयित आरोपीने विद्यार्थ्यांकडून जमा केलेली रक्कम बोर्डाकडे न भरता स्वतःकडे ठेवून एकूण तीन हजार 150 रूपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून त्यांना परीक्षेच्या प्रक्रियेत अडचणींना सामोरे जावे लागल्याचे समोर आले आहे. पहिलाजरॉय याचा कारनामा समोर आल्यानंतर अमोल गायकवाड यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद नोंदविली. पोलिसांनी पहिलाजरॉय विरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : २५ जुलै २०२६ – राष्ट्रकुलची परीक्षा; उंच भरारीची आशा

0
ग्लास्गो येथे सुरू झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यजमान स्कॉटलंडने काही महत्त्वाचे आणि लोकप्रिय खेळ वगळण्याचा एकतर्फी निर्णय घेतल्याचा फटका सर्वच सहभागी देशांना बसणार असला,...