Friday, May 3, 2024
Homeनगरबदल्यांमुळे झेडपीत तोबा गर्दी

बदल्यांमुळे झेडपीत तोबा गर्दी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेत सध्या कर्मचार्‍यांच्या बदल्यांचा कालावधी सुरू आहे. यामुळे दररोज मोठ्या संख्याने जिल्हा गर्दीत होत असून गुरूवारी तर मुख्य इमारतीपासून माळीवाड्याच्या दिशेला असणार्‍या माध्यमिक शिक्षण विभागापर्यंत चार चाकी आणि दुचाकी वाहनामुळे ट्राफीक जाम झाले होते. झालेली वाहतूक कोंडछी सोडवितांना जिल्हा परिषद सुरक्षा यंत्रणेच्या तोंडाला फेस आला होता.

- Advertisement -

गुरूवारी जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षण विभाग आणि ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या. या बदल्यांसाठी ग्रामसेवक संघटनेच्या नेत्यांपासून ते बदलीला पात्र नसलेल्या हौशी ग्रामसेवकांनी सहकुटूंब गर्दी केली होती. यामुळे जिल्हा परिषदेच्या आवार दुचाकी आणि चार चाकी वाहनांनी फुलून गेले होते. यात काहींनी आडमुठेपणा करत चुकीच्या पध्दतीने वाहने पार्क केल्यामुळे काेंंडीत मोठी भर पडली. त्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना अचानक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला जावे लागल्याने दुपारी उशीरापर्यंत बदल्याची प्रक्रिया सुरु नव्हती. यामुळे मोठ्या संख्येने आलेले कर्मचारी आवारात आणि मुख्य इमारतीमध्ये ठाण मांडून होते.

आधीचा अधूनमधून उन्हाचा कडका जाणवत असल्याने काहींनी तर गाडीत बसून एसीचा आनंद घेतला. मात्र, वेड्या वाकड्या पार्क केलेल्या वाहनामुळे कोंडीत अधिक भर पडली आणि त्याचा फटका झेडपीच्या सुरक्ष यंत्रणेवर पडला. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने दक्षता घेण्याची मागणी मुख्यालयातील कर्मचार्‍यांनी केली आहे. विशेष करून बेशिस्त पार्कींचा फटका महिला कर्मचार्‍यांना बसत असून त्यांची वाहने अडकून पडत असल्याची तक्रारी काहींनी केल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या