Thursday, May 2, 2024
Homeनाशिकजि. प. सदस्यांकडून प्रशासनाचा निषेध; ‘हे’ आहे कारण

जि. प. सदस्यांकडून प्रशासनाचा निषेध; ‘हे’ आहे कारण

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) आरोग्य विभागात (Health Department) औषध निर्माण अधिकारी फैयाज खान (Faiyaz khan) व विजय देवरे (Vijay Devre) हे तब्बल 12 वर्षांपासून प्रतिनियुक्तीवर आहेत…

- Advertisement -

याबाबत चौकशी व्हावी व त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करावी, असे ठराव होऊनही अमंलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ भाजपचे (BJP) गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे (Dr. Aatmaram Kumbharde) यांनी शुक्रवारी (दि.१७) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सभागृहात जमिनीवर बसत प्रशासनाचा जाहीरपणे निषेध नोंदवला. त्यांना सभागृहातील इतर सदस्यांनीही पाठींबा देत जमिनीवर बसले.

हे पाहून सभागृहाचे कामकाज आता चालवणे अशक्य असल्याचे लक्षात येताच अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर (Balasaheb Kshirsagar) यांनी तत्काळ चौकशीचे आदेश देत स्थायी समितीची बैठक तहकूब करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -

ताज्या बातम्या