Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारस्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना दाेन दिवस सुटी

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयांना दाेन दिवस सुटी

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशानुसार नंदुरबार (Zilla Parishad, Panchayat Samiti) जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकीसाठी ५ ऑक्टोबर २०२१ रोजी मतदान होणार आहे.

- Advertisement -

या पोटनिवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या मतदान अधिकारी, कर्मचार्‍यांना मतदान साहित्य घेऊन जाण्यासाठी दि.४ ऑक्टोबर रोजी रवाना करण्यात येणार आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्हा परिषद व त्यांअतर्गत असलेल्या अक्कलकुवा, शहादा व नंदुरबार येथील तीनही पंचायत समित्या मधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील शाळा, महाविद्यालयास ४ व ५ ऑक्टोबर २०२१ या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी निर्गमित केले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या