Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रउद्यापासून बससेवा होणार सुरु

उद्यापासून बससेवा होणार सुरु

सार्वमत

मुंबई – करोनाला रोखण्यासाठी राज्यशासनने दिलेल्या निर्देशानुसार रेड झोन व कंटेन्मेंट झोन वगळता राज्यातील इतर विभागांत काही अटीशर्तींच्या अधीन राहून उद्या 22 मे पासून जिल्हा-अंतर्गत एसटी बससेवा सुरू होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड.अनिल परब यांनी दिली आहे.

- Advertisement -

23 मार्च पासून गेले दोन महिने मुंबई व उपनगरात अत्यावश्यक सेवा वगळता एसटी बस सेवा संपूर्ण महाराष्ट्रात बंद आहे. परंतु लॉकडाऊनच्या चौथ्या कालखंडामध्ये राज्यशासनाने रेड झोन व कंटेंनमेंट झोन वगळता काही अटीशर्तींच्या अधीन राहून एसटी महामंडळाला केवळ जिल्ह्या-अंतर्गत (जिल्ह्याच्या सीमेपर्यंतच) एसटी बस सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील निवडक मार्गावर उद्यापासून एसटी बस सेवा सुरु होत आहे.

बससेवेसाठी असे आहेत नियम
-जिल्हा-अंतर्गत सकाळी 7.00 ते संध्याकाळी 7.00 पर्यंत ही बस सेवा सुरू राहील.
-प्रवासासाठी द्यावयाच्या सर्व बसेस योग्य सॅनिटायझरचा वापर करून निर्जंतुक केलेल्या असतील.
-सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बसच्या एकूण क्षमतेच्या केवळ 50 % प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा असेल.
-जेष्ठ नागरिक व 10 वर्षाखालील लहान मुलांना बस प्रवासाची परवानगी असणार नाही. (अत्यावश्यक वैद्यकीय कारण वगळून )
-प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचार्‍याने प्रवास सुरू करताना सॅनिटायझरने आपले हात निर्जंतुक करणे गरजेचे आहे.
-प्रवासामध्ये प्रत्येक प्रवाशाने व एसटी कर्मचार्‍याने तोंडाला मास्क लावणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्या

शेतीकामासाठी गाळ, मुरूमावरील रॉयल्टी रद्द

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai बळीराजाला आता स्वतःच्या शेती सुधारणेसाठी, विहीर, गोठा किंवा शेतघर बांधण्यासाठी लागणाऱ्या माती आणि मुरूमासारख्या गौण खनिजांसाठी शासनाला एक रुपयाचीही रॉयल्टी (स्वामित्व...