Friday, June 19, 2026
Homeधुळेखान्देशचे नेते हरपले, माजीमंत्री रोहिदास पाटील यांचे निधन

खान्देशचे नेते हरपले, माजीमंत्री रोहिदास पाटील यांचे निधन

धुळे । (प्रतिनिधी) : विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आज शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या 84 वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. ते काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे वडील होते. माजीमंत्री रोहिदास पाटील यांची अंत्ययात्रा शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवासस्थानापासून काढण्यात येणार असून एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांचे अंत्यदर्शन शनिवार दि.28 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटीतील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल.

ताज्या बातम्या

संपादकीय : १९ जून २०२६ – सत्ता संघर्षाचा अंक दुसरा!

0
महाराष्ट्रात अलिकडच्या काळात राजकीय भूकंपांचे प्रमाण इतके झाले आहे की त्यामुळे जनतेलाही फारसे हादरे वगैरे बसत नाहीत. त्यातही शिवसेना हा पक्ष भूकंपप्रवण झाला आहे...