Thursday, July 2, 2026
Homeनगरनगर – निंबळकचे रस्ते बंद करण्याची मागणी

नगर – निंबळकचे रस्ते बंद करण्याची मागणी

अहमदनगर (वार्ताहर) – कोरोना आजारापासून बचाव करण्यासाठी निंबळक येथील गावांत येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्याबाबत परवानगी मिळावी, असे निवेदन निंबळक ग्रामपंचायतचे सरपंच साधना लामखडे, ग्रामविकास अधिकारी अनिल भाकरे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना दिले.

सध्या संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी गावात वाहतुकीमुळे गर्दी वाढू नये, निंबळक गावातून एमआयडीसी मार्ग चारचाकी वाहने, मालवाहतूक गाडया बाहेर गावातून, जिल्ह्यातून, राज्यातून येतात. यांच्यापासून कोरून विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या सीमा बंद करण्यास परवानगी मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

RTI Maharashtra : अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा धसका, माहिती अधिकार कायद्यातील बदलांना...

0
मुंबई । Mumbai माहितीचा अधिकार (RTI) अधिक सक्षम आणि पारदर्शक होण्याऐवजी, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारे नवे नियम अखेर मागे घेण्याची नामुष्की सरकारवर आली आहे. ज्येष्ठ...