संगमनेर (प्रतिनिधी) – कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यासह जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहे. तर भारत देशात सरकारने लॉकडाऊन केले आहे. असे असतांना संगमनेरात बेकायदेशिर जमाव करुन सार्वजनिक उपद्रव करुन मानवी व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य करणार्या 15 ते 20 जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी जमावबंदी आदेश दिला आहे. राज्य सरकराने संचारबंदी तर भारत देशात सरकारने लॉकडाऊन केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शासन, प्रशासनाकडून सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. पोलीस प्रशासन या आदेशाची अंमलबाजवणी करण्यासाठी रात्रं दिवस कार्यरत आहे. या काळात बाहेर फिरु नका, घरात बसा, असा नियम पाळला तर कोरोना नियंत्रीत येवू शकेल, यासाठी प्रयत्न होत असतांना संगमनेरात गुरुवारी दुपारी 12.30 वाजता इस्लामपुरा मस्जिद नगर रोड येथे सलमान अब्दुल शेख (वय 35, रा. इस्लामपूर संगमनेर), माजीद हरून शेख (वय 33, रा. नाईकवाडपुरा, संगमनेर), आजीमखान नासिरखान खान (वय 38, रा. रहेमतनगर संगमनेर), निजामुद्दीन फकीर मोहमद तांबोळी (वय 59, रा. करुले, ता. संगमनेर), चांद अब्बास (वय 65, रा. मेंढवण, ता. संगमनेर), शोएब शाबीर खतीन (वय 22, रा. सुकेवाडी रोड संगमनेर) तसेच पळून गेले मौलाना अकिल शकिर काकर तसेच अलका फ्रुट वाला नाव माहीत नाही व सलीम मिश्री व इतर 15 ते 20 इसमांनी बेकायदेशीर जमाव जमून सार्वजनिक उपद्रव करून हायगयीने मानवी जीवित व व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात येईल असे कृत्य व संसर्ग पसरवण्याची घातक कृती, शासनाचे विविध आदेशांचा भंग करतांना पोलिसांना मिळून आले असता त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत व पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. कवडे करत आहे.




