Saturday, October 3, 2026
HomeनगरCrime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून नर्सची 13 लाखांची फसवणूक

Crime News : लग्नाचे खोटे आमिष दाखवून नर्सची 13 लाखांची फसवणूक

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

लग्नाचे खोटे आमिष दाखवून एका 33 वर्षीय खाजगी नर्सची तब्बल 13 लाख रुपये आणि तीन तोळे सोन्याने फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात आरोपी दादाराव रामोजी भांगे (वय 29, रा. आवलगांव, जि. जालना) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, जून 2021 ते जून 2026 या पाच वर्षांच्या कालावधीत आरोपीने पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. या काळात त्याने शिर्डी येथील एस. एस. पॅलेस हॉटेलवर महिलेशी वेळोवेळी शरीरसंबंध प्रस्थापित केले. याच विश्वासाचा गैरफायदा घेऊन आरोपीने महिलेकडून टप्प्याटप्प्याने 13 लाख रुपये रोख आणि तीन तोळे सोने उकळले. मात्र, इतका काळ उलटूनही आरोपीने लग्न करण्यास टाळाटाळ केली आणि घेतलेले पैसे व सोने परत देण्यास नकार दिला.

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिलेने शिर्डी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 316(2) आणि 69 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अमोल भारती व पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सागर काळे करत असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले, चार मुलांची आई असल्याचे उघड

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या...