Wednesday, September 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे उद्या नाशिक दौऱ्यावर

आदिवासी आंदोलकांशी साधणार संवाद

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार आदित्य ठाकरे गुरुवारी दि.३) नाशिक दौऱ्यावर येत असून, आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांसाठी सुरू असलेल्या उपोषणाला भेट देऊन आंदोलकांशी संवाद साधणार आहेत.

आदित्य ठाकरे सकाळी १० वाजता ईदगाह मैदानाच्या मागील गेट येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते आदिवासी बांधवांच्या विविध प्रश्नांची माहिती जाणून घेणार असून, त्यांच्या आंदोलनाला पक्षाच्या वतीने पाठिंबा व्यक्त करणार आहेत.

या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, शालीमार चौक, नाशिक यांच्यावतीने जिल्ह्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख डी. जी. सूर्यवंशी आणि शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश गिते यांनी केले आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : खासगी बसची दुचाकीला धडक; विवाहितेचा मृत्यू, रक्षाबंधन आटोपून...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik माहेरचा रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करून पतीसोबत सासरी परतणाऱ्या एका २७ वर्षीय विवाहितेचा रस्ते अपघातात मृत्यू (Road Accident Deth) झाल्याची...