Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'नशामुक्त युवा - विकसित भारत संकल्प' अभियानाचा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘नशामुक्त युवा – विकसित भारत संकल्प’ अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती

- Advertisement -

नागपूर । वृत्तसंस्था Nagpur

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे ‘नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘रामगिरी’ येथून दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करताना व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम युवा शक्ती घडविण्याचा संकल्प या अभियानाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे. युवकांनी अमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून शिक्षण, कौशल्य, क्रीडा आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैली स्वीकारून समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. व्यसनमुक्त भारत आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन, शैक्षणिक संस्था, पालक, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

‘नशामुक्त युवा विकसित भारत संकल्प ’ हे अभियान युवकांमध्ये अमली पदार्थांविरोधात जनजागृती निर्माण करून त्यांना सकारात्मक, निरोगी आणि जबाबदार जीवनशैलीकडे प्रेरित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आले आहे.

मोहिमेच्या महत्त्वाकांक्षी 100 आठवड्यांच्या आराखड्याची माहिती देताना त्यांनी सांगितले की, येणाऱ्या प्रत्येक रविवारी कला, संस्कृती, क्रीडा आणि ध्यानधारणा यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करून नव्या सहभागींचा सातत्याने सहभाग सुनिश्चित केला जाईल. “पुढील 100 रविवार हे पूर्णपणे व्यसनमुक्त भारताच्या दिशेने टाकली जाणारी 100 भक्कम पावले ठरतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ताज्या बातम्या

Pathardi : दुष्काळात शेतकर्‍यांना चोरट्यांचा ‘शॉक’!

0
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi दुष्काळी परिस्थितीमुळे आधीच अडचणीत असलेल्या पाथर्डी तालुक्यात शेतकर्‍यांसमोर आता सौरपंप व विद्युत मोटारींच्या केबल चोरीचे नवे संकट उभे राहिले आहे....