Thursday, September 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : आदिवासी विद्यार्थी आंदोलकांशी अभिजित दिपकेंनी भेट देऊन साधला संवाद;...

Nashik News : आदिवासी विद्यार्थी आंदोलकांशी अभिजित दिपकेंनी भेट देऊन साधला संवाद; आंदोलकांना पाठिंबा केला जाहीर

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

गोल्फ क्लब मैदानावर गेल्या १२ दिवसांपासून विविध न्याय्य मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले प्राणांतिक उपोषण आता राज्य सरकारच्या अडचणी वाढविणारे ठरत आहे. आंदोलनस्थळी बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी संवाद साधत पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर गुरुवारी सकाळी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. या पाठोपाठ गुरुवारी सायंकाळी युवा नेते अभिजित दिपके यांनी आंदोलनस्थळी धाव घेत सरकारवर जोरदार तोफ डागली. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून आंदोलनाला आता राजकीय धार आली असून, सरकारविरोधातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

आंदोलनस्थळी उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची प्रकृती, आश्रमशाळांमधील दुरवस्था आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांची पाहणी केल्यानंतर दिपके यांनी राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास विभागावर सडकून टीका केली. आश्रमशाळांमधील उघडी शौचालये, अस्वच्छ पाणी, निकृष्ट अन्न आणि विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टांचे छायाचित्रे दाखवत त्यांनी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

“आंदोलनाचा वणवा महाराष्ट्रभर पेटवू”
दरम्यान, उपोषणकर्त्या विद्यार्थ्यांची ढासळती प्रकृती पाहता दिपके यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले. “तुमचा जीव या लढ्यापेक्षा मोठा आहे. संवेदनहीन सरकारला तुमच्या जीवाची किंमत नसेल; मात्र महाराष्ट्राला तुमचा आवाज हवा आहे. त्यामुळे उपोषण थांबवा आणि हा लढा आणखी व्यापक करा,” असे त्यांनी सांगितले.

“महाराष्ट्रातील सर्व आदिवासी विद्यार्थ्यांना एकत्र करून या आंदोलनाचा वणवा राज्यभर पेटवू. गरज पडली तर मुंबईत धडक देऊ आणि राजभवनावरही आवाज बुलंद करू. या संघर्षात मी राजकीय नेता म्हणून नव्हे, तर विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असा निर्धार दिपके यांनी व्यक्त केला.

राहुल गांधी, आदित्य ठाकरे आणि आता अभिजित दिपके यांच्या पाठिंब्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला सलग दुसऱ्या दिवशी राजकीय नेत्यांची साथ मिळाली आहे. त्यामुळे गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखल सरकारला आता अधिक गांभीर्याने घ्यावी लागणार असून, आगामी काळात हा प्रश्न राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी येण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

Kopargaon : पोलिसांनी 3 किमी फिल्मी स्टाईल पाठलाग करत अपहरणाचा कट...

0
कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon पुण्यातून (Pune) एका 24 वर्षीय तरुणाचे अपहरण (Young Man Abduction) करून त्याला थेट उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पळवून नेण्याचा धक्कादायक कट...