Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुर्दैवी : विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

दुर्दैवी : विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

मालेगाव | प्रतिनिधी Malegaon

- Advertisement -

घरात खेळत असतांना पाणी तापवण्याच्या हिटरचा स्पर्श झाल्याने ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. तालुक्यातील साकुरी येथे ही दुर्दैवी घटना झाली. मल्हार बाळसाहेब आहिरे असे या दुदैवी मृत बालकाचे नाव आहे.

सकाळच्या सुमारास घरात पाणी तापविण्यासाठी कुटूंबीयांनी बादलीत हिटर लावले होते. यावेळी लहानगा मल्हार खेळता खेळता तो अचानक पाणी तापवण्यासाठी लावलेल्या हीटरजवळ गेला व त्याने हिटरला हात लावल्याने त्याला विजेचा जोरात धक्का बसला.

हा प्रकार लक्षात येताच नातेवाइकांनी त्याला तातडीने उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णाल दाखल केले. मात्र, तो पर्यंत उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकिता यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या घटनेने कुटूंबीयांवर मोठा आघात झाला आहे.

ताज्या बातम्या

स्फोटक

स्फोटक साठा प्रकरण: होलसेलरची एटीएसकडून चौकशी; एक्सपायर्ड अन् दुसऱ्याच्या नावावरील परवान्यावर...

0
नाशिक। प्रतिनिधीतालुक्यातील आंगणगाव येथे दहशतवादविरोधी पथकाच्य (एटीएस) नाशिक युनिटने छापा टाकून जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्याप्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. तपासादरम्यान संशयिताकडे आढळलेला स्फोटकांचा परवाना...