Wednesday, November 18, 2026
Homeक्राईमCrime News : संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा

Crime News : संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध कत्तलखान्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 17) छापा टाकला. या कारवाईत तब्बल 1400 किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरण्यात येणारे तीन चाकू, दोन लोखंडी कुर्‍हाडी आणि इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण 4 लाख 22 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच कत्तल करणारे संशयित पसार झाले.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखाली अतुल लोटके, गणेश लबडे, प्रकाश मांडगे, अमोल आजबे आणि संभाजी कोतकर यांचे पथक नियुक्त केले होते. हे पथक संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायांची माहिती घेत असताना जमजम कॉलनी गल्ली क्रमांक 10 येथे फैजान अक्तार शेख यांच्या घरालगत असलेल्या निळ्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने पंचांसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकून पाहणी केली असता शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल झाल्याचे आढळून आले.

मात्र, कत्तल करणारे इसम घटनास्थळी मिळून आले नाहीत. पोलिसांनी घटनास्थळावरून 4 लाख 20 हजार रुपये किमतीचे 1400 किलो गोमांस, 700 रुपये किमतीचे तीन चाकू व दोन लोखंडी कुर्‍हाडी आणि दोन हजार रुपये किमतीचा इलेक्ट्रिक वजनकाटा असा एकूण 4 लाख 22 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : टंचाईचे संकट; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला दोन महिने बंदी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे चारा साठा कमी होत असल्याने पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणारा...