Wednesday, November 18, 2026
HomeनगरAhilyanagar : टंचाईचे संकट; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला दोन महिने बंदी

Ahilyanagar : टंचाईचे संकट; जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीला दोन महिने बंदी

हिरवा-कोरडा चारा, मुरघास अन् टीएमआरच्या वाहतुकीवर निर्बंध

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीमुळे चारा साठा कमी होत असल्याने पशुधनाच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणारा हिरवा व कोरडा चारा, मुरघास तसेच टोटल मिक्स रेशन (टीएमआर) जिल्ह्याबाहेर वाहतूक करण्यास पुढील दोन महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी 16 नोव्हेंबर रोजी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

- Advertisement -

जिल्ह्यात सध्या दुष्काळामुळे सर्व तालुक्यांमध्ये चारा उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील पशुधनाची एकूण संख्या 26 लाख 15 हजार 706 इतकी आहे. या पशुधनासाठी चारा टंचाईच्या निकषानुसार दरमहा सुमारे 8 लाख 95 हजार 243 मेट्रिक टन चार्‍याची आवश्यकता आहे. खरीप हंगामातील पेरणीनुसार 4 लाख 54 हजार 189 मेट्रिक टन चारा उत्पादन झाले आहे. मात्र, उपलब्ध चारा साठा आणि पशुधनाची गरज यामध्ये मोठी तफावत असल्याने प्रशासनाने चारा वाहतुकीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 16 नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस बंदी घालण्यात आली होती. मात्र, सद्यस्थितीत जिल्ह्यातील चारा उपलब्धतेचा आढावा घेतल्यानंतर ही बंदी आणखी दोन महिने कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात उत्पादित होणारा हिरवा व कोरडा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स रेशन (टीएमआर) इतर जिल्ह्यांत वाहून नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 163 नुसार जिल्हाधिकार्‍यांना प्राप्त अधिकारांचा वापर करून हा आदेश काढण्यात आला आहे. आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून पुढील दोन महिन्यांच्या कालावधीसाठी ही बंदी लागू राहणार आहे.दरम्यान, जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध होणारा चारा जिल्ह्यातच राहावा आणि स्थानिक पशुपालकांना चारा टंचाईचा अधिक फटका बसू नये, हा या निर्णयामागील उद्देश आहे. आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय व तालुका दंडाधिकारी, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना आवश्यक कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : संगमनेरमध्ये अवैध कत्तलखान्यावर एलसीबीचा छापा

0
संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner शहरातील जमजम कॉलनी परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध कत्तलखान्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (दि. 17) छापा टाकला. या कारवाईत तब्बल...