Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिकच्या प्रिया पगारची सीए परीक्षेत गरुडझेप

नाशिकच्या प्रिया पगारची सीए परीक्षेत गरुडझेप

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

‘द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’ (ICAI) तर्फे जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन आणि सीए इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये नाशिकच्या प्रिया सचिन पगार हिने ३६६ गुण मिळवून शहरातून द्वितीय क्रमांक पटकावण्याचे देदीप्यमान यश संपादन केले आहे. आपल्या यशाचे गमक सांगताना तिने दररोज सलग १२ तास अभ्यास केल्याचे नमूद केले.

सीए ही देशातील अत्यंत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. यंदा नाशिक शहरातून एकूण ६०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. प्रियाने या परीक्षेसाठी ‘इम्पॅक्ट कॉमर्स अकादमी’मध्ये प्रवेश घेतला होता. गेल्या तीन वर्षांपासून तिने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने घरीच राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केले होते.

असा आहे गुणतक्ता

प्रियाने दोन्ही ग्रुपमध्ये मिळून एकूण ३६६ गुण मिळवले आहेत. तिने विषयानुसार मिळवलेले गुण खालीलप्रमाणे आहेत.

ग्रुप १ (१८१ गुण): ॲडव्हान्स अकाउंट (७०), कॉर्पोरेट लॉ (६०) आणि टॅक्सेशन (५१).

ग्रुप २ (१८५ गुण): कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटिंग (६८), ऑडिटिंग अँड एथिक्स (६८) आणि फायनान्शिअल व स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (४९).

हे यश केवळ मेहनतीचे फळ आहे. अभ्यासाच्या प्रवासात मला सीए भरत तुलसीयानी, सीए मकरंद जैन, सीए नील शहा, सीए प्रज्ञा डागा आणि माझ्या आई-वडिलांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
प्रिया सचिन पगार

ताज्या बातम्या

Ahilyanagar : महिनाभरातच नववधूचे बिंग फुटले, चार मुलांची आई असल्याचे उघड

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याचा गैरफायदा घेत मुंबईतील एका एजंट महिलेने राहुरी तालुक्यातील तरुणाला लग्नासाठी मुलगी दाखवून त्याच्याकडून चार लाख रुपये उकळले. मोठ्या...