Friday, November 20, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik : नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांचे आगमन

Nashik : नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात विदेशी पाहुण्यांचे आगमन

३२ हजारांवर पक्ष्यांचा मुक्काम; फ्लेमिंगोंच्या आगमनाने अभयारण्य गजबजले, पक्षी निरीक्षकांसाठी पर्वणी

- Advertisement -

करंजी खुर्द | वार्ताहर Karanji Khurda

गुलाबी थंडीची चाहूल लागताच रामसर दर्जा प्राप्त निफाड तालुयातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. यंदा थंडीचे आगमन काहीसे उशिरा झाल्याने स्थलांतरित पक्ष्यांचा मुक्कामही उशिरा सुरू झाला. मात्र, गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढू लागल्याने युरोप, सायबेरिया, मंगोलिया, कझाकिस्तान, पाकिस्तान, अमेरिका तसेच दक्षिण आशियातील विविध प्रदेशांतून आलेल्या पक्ष्यांनी अभयारण्य गजबजले असून, सुमारे ३२ हजारांहून अधिक पक्ष्यांची नोंद झाली आहे. त्यात अभयारण्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या सुमारे ७० फ्लेमिंगोंचाही समावेश आहे.

हे फ्लेमिंगो चापडगाव शिवारातील गोदावरी नदी परिसरात स्वच्छंदपणे विहार करताना दिसत आहेत. हजारो किलोमीटरचा प्रवास करून दाखल झालेल्या या परदेशी पाहुण्यांमुळे दिवाळी सुट्टीतच अभयारण्याला विशेष रंगत आली आहे. साधारण चार फूट उंची, लांब पाय आणि वैशिष्ट्यपूर्ण लांब चोच असलेला फ्लेमिंगो पक्षी पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्या पंखांचा खालचा लालसर रंग आकाशात उडताना अग्निज्वाळांसारखा भासतो. त्यामुळे त्याला ’अग्निपंख’ असेही संबोधले जाते. या पक्ष्याला रोहित या नावानेही ओळखले जाते. सप्टेंबर-ऑटोबर हा फ्लेमिंगोंचा विणीचा काळ असतो.

या कालावधीत अंडी उबवून पिलांना जन्म दिल्यानंतर पिले मोठी झाल्यावर हे पक्षी खाद्य आणि अनुकूल अधिवासाच्या शोधात स्थलांतर करतात. त्यातूनच नांदुरमध्यमेश्वर परिसरात त्यांचे आगमन होते. सध्या धरणातून मर्यादित प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने अभयारण्य परिसरात पाणथळ व दलदलीचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांना खाद्य शोधणे सुलभ झाले असून, परिसरातील विपुल वनराई, पानवेली, फळे व नैसर्गिक खाद्यसंपत्तीमुळे त्यांना पोषक वातावरण मिळत आहे.

सध्या अभयारण्यात फ्लेमिंगोंसह गॉडविट, ब्लॅक टेल्ड गॉडविट, व्हाइट स्टॉर्क, बार-हेडेड गूज, रेड-क्रेस्टेड पोचार्ड, जांभळी कोंबडी, ब्राह्मणी बदक, थापाड्या, भुवई बदक, तलवार बदक, मोठा ठिपकेदार गरुड, दलदल ससाणा, लाल डोयाचा शराटी, पांढरा शराटी, रंगीत करकोचा, उघड्या चोचीचा करकोचा, कॉमन क्रेन, राखी बगळा, चमचा, कमळ पक्षी, लाल मुनिया, हळदी-कुंकू, जांभळा बगळा, तरंग आणि खंड्या आदी प्रजातींचे पक्षी आढळून येत आहेत.

थंडीचे प्रमाण जसजसे वाढेल, तसतशी पक्ष्यांची संख्या आणखी वाढण्याची शयता असून, पुढील काही महिने या स्थलांतरित पक्ष्यांचा अभयारण्यात मुक्काम राहणार आहे. त्यामुळे देशभरातील निसर्गप्रेमी, छायाचित्रकार आणि पक्षी निरीक्षकांसाठी नांदुरमध्यमेश्वर हे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. पर्यटकांच्या सोयीसाठी अभयारण्य प्रशासनाच्या वतीने वाहनतळ, पक्षीनिरीक्षणासाठी अत्याधुनिक दुर्बिणी, पक्ष्यांची माहिती देणारे मार्गदर्शक, भोजन व निवास व्यवस्था तसेच अभयारण्याकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक उपलब्ध करून देण्यात आले.

विपुल वनराई, पाणथळ आणि दलदलीचा प्रदेश निर्माण झाल्याने पक्ष्यांना खाद्य शोधणे सुलभ झाले आहे. थंडीचा हंगाम सुरू झाल्याने देशी-विदेशी पक्ष्यांचे आगमन होत आहे. यंदा फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या चांगली असून, आगामी काळात आणखी पक्षी दाखल होण्याची अपेक्षा आहे. पर्यटकांना पक्षीनिरीक्षणाचा आनंद घेता यावा, यासाठी अभयारण्याच्या वतीने अधिकाधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हिरालाल चौधरी, वनपरिक्षेत्र अधिकारी, पक्षी अभयारण्य

ताज्या बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : ओटीएस (वन टाइम सेटलमेंट)...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत एकवेळ समझोता (वन टाइम सेटलमेंट) योजनेतील पात्र शेतकरी लाभार्थ्यांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर...