Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशप्रतिक्षा संपली : या तारखेपासून सामान्यांना लसीकरण

प्रतिक्षा संपली : या तारखेपासून सामान्यांना लसीकरण

नवी दिल्ली

अखेर ज्याची प्रतिक्षा सामान्यांना होती तो दिवस जवळ आलाच. आता सर्वसामान्यांचंही लसीकरण होणार आहे. १ मार्चपासून सर्वसामान्य नागरिकांनाही कोरोना लस दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

१० हजार सरकारी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसेच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. तसेच २० हजार खासगी रुग्णालयांचा यात समावेश आहे. ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचे आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल. आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालयं आणि लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे.

ज्यांना सरकारी केंद्रावर लस दिली जाईल, त्यांना मोफत लस मिळेल. तर ज्यांना खासगी रुग्णालयात लस दिली जाईल, त्यांच्याकडून शुल्क आकारला जाईल. कोरोना लशीसाठी किती पैसे घेतले जातील याबाबत आरोग्य विभाग दोन तीन दिवसांत घोषणा करेल, असंही जावडेकर यांनी सांगितलं.

केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथक

दरम्यान करोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या राज्यांमध्ये केंद्र सरकारकडून तीन सदस्यीय पथकं पाठवण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रासहित केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक, जम्मू आणि काश्मीरमध्ये ही पथकं पाठवण्यात आली असून करोनाशी लढण्यात मदत करणं हा मुख्य हेतू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या