Wednesday, July 29, 2026
Homeब्रेकिंग न्यूजफ्रान्समध्ये विमान कोसळून ११ जण ठार

फ्रान्समध्ये विमान कोसळून ११ जण ठार

फ्रान्स | वृत्तसंस्था

- Advertisement -

फ्रान्समधील ईशान्य भागात असलेल्या टॉम्बलेन शहरात रविवारी सकाळी एका पॅराशूटिस्ट (स्कायडायव्हिंग) स्कूलचे छोटे विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पायलट, ५ विद्यार्थी (बहुतांश नर्स) आणि ५ प्रशिक्षकांचा समावेश आहे.

विमान वर चढत असतानाच अचानक इंजिनचा आवाज बंद झाला आणि ते वेगाने खाली कोसळले. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, हे विमान काही मीटर अंतरावर असलेल्या निवासी किंवा शॉपिंग सेंटरवर न कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. फ्रान्सचे गृहमंत्री ब्रुनो रिटेलेओ हेही घटनास्थळी पाहोचले.विमान अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

एनसीएमसी स्मार्ट कार्ड साठी मुदतवाढ

0
मुंबई | वृत्तसंस्था Mumbai एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला १ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ...