Friday, September 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअपघातात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

अपघातात ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

नांदगाव । प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

नांदगाव-मालेगांव महामार्गावरील एका हार्डवेअर दुकानासमोर राजेंद्र कारभारी इघे (५५) हे नवीन पाण्याची टाकी चारचाकी वाहनावर दोरीने बांधत असताना हातातून दोर निसटल्याने जवळूनचजाणाऱ्या ट्रकच्या मागच्या भागावर आदळल्याने गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदगाव-मालेगांव महामार्गावर रविवारी दुपारी एका हार्डवेअर दुकानासमोर राजेंद्र कारभारी इघे (५५) हे चारचाकीवर चढून नवीन पाण्याची टाकी दोरीने होते बांधताना हातातून दोर निसटल्याने जवळूनच जाणाऱ्या ट्रकच्या मागच्या भागावर आदळल्याने गंभीर जखमी होऊन मरण पावल्याची घटना घडली आहे. ट्रकच्या मागील बाजूचे लोखंडी हुकवर डोके आदळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातात गंभीर जखमी झालेल्या राजेंद्र इघे यांना तेथे असलेल्या काही नागरिकांनी त्वरित येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीअंती घोषित केले. ईघे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

नांदगाव पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन अपघाताचा पंचनामा केला. याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ताज्या बातम्या

टिप्पर

Nashik Crime News: नाशकात लेडी ब्लॅकमेलरची दहशत; सीएला तब्बल १० लाखांचा...

0
नाशिक | प्रतिनिधीआर्थिक फसवणूक व्यवहारातून आणि त्यानंतर पोलिसांत खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकी देत सीए (चार्टर्ड अकाउंटंट) कडून लाखोंची खंडणी उकळणाऱ्या एका हायप्रोफाईल महिलेचा पराक्रम...