Sunday, September 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजअल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास अटक

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमास अटक

मुंबई

- Advertisement -

मुंबईच्या पायधुणी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिक आक्रमक झाले आहेत.या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पावले उचलत नराधम सुरक्षा रक्षकाला अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडित 7 वर्षांची मुलगी इमारतीमधील वॉशरूममध्ये गेली होती. याच संधीचा फायदा इमारतीमध्ये तैनात असलेल्या नराधम सुरक्षा रक्षकाने वॉशरूममध्ये प्रवेश केला आणि मुलीवर लैंगिक अत्याचार केला. सदर घटनेत मुलगी गंभीर जखमी झाल्यामुळे तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी पायधुनी पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि पोलीस ठाण्यासमोर मुख्य रस्ता देखील अडवून रास्तारोको आंदोलन सुरू केले. नराधम सुरक्षा रक्षकाला तत्काळ पोलीस स्टेशनमध्येच फाशी द्या, अशी मागणी नागरिकांनी केली. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस ठाण्याबाहेर मोठा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : राजकारणात टीका करताना लक्ष्मणरेषेचे भान ठेवा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राजकीय टीका करताना कौटुंबिक विषय टाळले पाहिजेत. आमच्यावर राजकीय टीका करा, आमच्या कार्यपद्धतीवर किंवा सरकारच्या कामावर टीका करा, मात्र कौटुंबिक वादात...