Saturday, September 12, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : शाळेच्या बसला अपघात

Nashik News : शाळेच्या बसला अपघात

चालकाच्या प्रसंगावधानामुळे 15 विद्यार्थी सुरक्षित; दुचाकीस्वार महिला जखमी

- Advertisement -

पंचवटी | प्रतिनिधी Panchavati

पडसाद मूकबधिर विद्यालयाच्या बसचे अचानक ब्रेक निकामी होऊन स्टेअरिंग लॉक झाल्याने शनिवारी (दि. १२) दुपारी पंचवटीतील गोदाघाट परिसरात अपघात झाला. चालक विकास हरिभाऊ दिघे यांनी प्रसंगावधान राखत बस एका बाजूला वळवल्याने मोठा अनर्थ टळला. बसमधील 15 ते 16 मूकबधिर विद्यार्थी सुखरूप बचावले. मात्र, बसची धडक बसल्याने दुचाकीस्वार अंकिता मनोहर जाधव (वय ३२, रा. दुर्गानगर, पेठ रोड) या जखमी झाल्या.

पडसाद मूकबधिर विद्यालयाची बस (एमएच १५ ए.के. १४२८) सिडको परिसरातून विद्यार्थ्यांना पंचवटीत सोडण्यासाठी येत होती. गोदाघाट परिसरात आल्यानंतर अचानक बसचे ब्रेक फेल झाले आणि स्टेअरिंग लॉक झाले. हा प्रकार लक्षात येताच चालक दिघे यांनी बसवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मोठा अपघात टाळण्यासाठी त्यांनी बस रस्त्याच्या एका बाजूला वळवली. यावेळी बसने गोदापार्क येथील पत्र्याच्या शेडला धडक दिली. त्यापूर्वी बसची धडक दुचाकीवरून जाणाऱ्या अंकिता जाधव यांना बसली.अपघात होताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

बसमधील सर्व ३५ विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. जखमी अंकिता जाधव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ह्या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील व गुन्हे शोध पथक व गोपनीय पोलीस कर्मचारी दाखल झाले. या संदर्भात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.


ताज्या बातम्या

आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण नियोजनाची बैठक; माजी महापौर आणि आयुक्तांमध्ये शाब्दिक...

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या धर्म ध्वजारोहण आणि ग्राम परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी शनिवारी (दि.१२) श्री शुक्ल यजूर्वेदिय ब्राह्मण संस्थेत रामसेतू पुलाजवळ बैठक आयोजित करण्यात...