दिंडोरी | प्रतिनिधी
दिंडोरी शहरात दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार राज्यातील पर्जन्यमान हे प्रामुख्याने नैऋत्य मोसमी वाऱ्यांवर अवलंबून असून, हवामानातील बदलांमुळे पर्जन्यमानाची अनिश्चितता, कालावधी व वितरण यामध्ये सातत्याने बदल होत आहेत. अल निनोच्या प्रभावामुळे या वर्षी पर्जन्यमानात घट झाल्याने मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णय नुसार २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे. अल निनोचा प्रभाव पुढील वर्षीपर्यत राहणार असल्याने राज्यातील उपलब्ध जलसाठ्याचे काटकसरीने व अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करून ३१ ऑगस्ट २०२७ पावेतो पाणी वापराबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत.
तसेच नाशिकचे जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक व सह आयुक्त नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांनी राज्यातील दुष्काळ सदृश्य परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी पिण्याची पाण्याची टंचाई उद्भवू नये यासाठी तातडीने उपयोजना करणे बाबत कळविण्यात आलेले आहे.
जिओ IPOचा बाजारात धमाका! अवघ्या १०० मिनिटांत पूर्ण सबस्क्रिप्शन; भारतातील मोठ्या IPOमध्ये नवा विक्रम
दिंडोरी नगरपंचायत मार्फत शहरात ओझरखेड धरण येथून पाणीपुरवठा करण्यात येत असून सद्यस्थितीत शहरास ३.५ MLD चा पाणी पुरवठा एक दिवस आड प्रत्येक प्रभागात एक तास करण्यात येत आहे. तथापि दुष्काळ सदृश्य परीस्थितीच्या पार्श्वभूमीवर नियोजनबद्ध पद्धतीने व्यवस्थापन करून ३१ ऑगस्ट २०२७ पावेतो पाणी वापराबाबतचे निर्देश असल्यामुळे दिंडोरी शहरात दि.२६/१०/२०२६ पासून पाणी वितरणात १० टक्के पाणी कपात तसेच आवश्यकते प्रमाणे पाणी कपात वाढविणार आहे.
तसेच शहरातील ज्या प्रभागामध्ये नळ संयोजन धारकांनी नळाला तोट्या बसवलेल्या नाही किवा पिण्याच्या पाण्याचा अपव्य करतांना आढळून आल्यास प्रथम वेळेस शास्ती र.रु.५००/-, दुसऱ्या वेळेस शास्ती र.रु.१०००/-, तिसऱ्या वेळेस शास्ती र.रु.५०००/-,पुनश्च पिण्याच्या पाण्याचा अपव्य करतांना आढळून आल्यास संबंधित नळ संयोजन धारकाचे कायम स्वरूपी नळ संयोजन बंद करण्यात येणार आहे. तरी दिंडोरी शहरातील सर्व नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची नासाडी करू नये व पिण्याचे पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.




