Friday, July 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDada Bhuse: १२वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला नसेल तर त्यांच्यासाठी मोठी बातमी!...

Dada Bhuse: १२वीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरला नसेल तर त्यांच्यासाठी मोठी बातमी! राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

मुंबई | Mumbai
राज्यातील जवळपास २० जिल्ह्यांत, त्यातही विशेषत: मराठवाड्यातील जिल्ह्यांत पाऊस आणि महापुराने सर्वसामान्यांचे जगणे उद्ध्वस्त केले. शेती, पिके, घरेदारे, गुरेढोरे सगळे काही वाहून गेले. शाळकरी आणि महाविद्यालयीन पोरांची वह्या, पुस्तके, दप्तरे सगळे वाहून गेलेय. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पूरग्रस्त विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी १२ वी चे अर्ज भरायला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

बारावी परीक्षेचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी संपत आहे. परंतु पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे मराठवाड्यातील हजारो १२ वी च्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचा अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्याचा उद्याचा एकच दिवस बाकी असल्याने एवढ्या जणांचे अर्ज भरणे शक्य नसल्याने मुदतवाढीची मागणी केली जात होती.

- Advertisement -

कोणत्याही विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून १२वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी दादा भुसे यांनी दिली आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांनी याबद्दल सरकारकडे गाऱ्हाणे मांडले होते. यानंतर सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.

शिक्षणमंत्री दादा भुसे नेमकं काय म्हणाले?
शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊन गेला आहे. त्यानुसार १२ वी च्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली आहे. शाळा इमारतीच्या नुकसान यावर लक्ष ठेऊन आहे. कार्यवाही करु. पुढच्या आठवड्यात राज्यभरातील अहवाल घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती दाद भुसे यांनी दिली.

पुढे त्यांनी सांगिले की, राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी संपर्क केला आणि अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्याचे निर्देशही दिले. त्यानुसार शिक्षण विभागामार्फत २० ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात शिक्षण विभागामार्फत परिपत्रक जारी करण्याची प्रक्रिया करण्यात आली. त्याचबरोबर बाह्य पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील अर्ज भरण्याची मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच नवीन परीक्षा केंद्रासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत १० ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

पडसाद : त्र्यंबकची माळीण होऊ द्यायची नसेल तर…

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक त्र्यंबकेश्वर आणि आजूबाजूचा परिसर गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा सामना करीत आहे. अलीकडेच आलेल्या...