Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्य सरकारने बुधवारी पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांची बदली उच्च आणि तंत्रशिक्षण विभागात रुसाचे प्रकल्प संचालक म्हणून झाली आहे. तर पाटील यांच्या जागी यशदाचे उप महासंचालक मंगेश जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बदली पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी झाली आहे. अहेरीचे (जि. गडचिरोली) प्रकल्प अधिकारी कुशल जैन यांची बदली सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर झाली आहे. धाराशिवचे सहाय्यक जिल्हाधिकारी रिवांह डोंगरे यांची बदली पांढरकवडाचे (जि. यवतमाळ) प्रकल्प संचालक म्हणून झाली आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....