Sunday, August 30, 2026
Homeनाशिकभारनियमनाने शेतकरी त्रस्त

भारनियमनाने शेतकरी त्रस्त

ग्रामीण भागात रात्री भारनियमन बंद करण्याची मागणी

- Advertisement -

ओझे l विलास ढाकणे Oze

संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कृषी फिडरवर गेल्या तीन दिवसापासून रात्रीचे भारनियमन गेले जात असल्यामुळे वाडी वस्ती व मळ्यात राहणाऱ्या नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. आधीच असलेला बिबट्यांचा वावर त्यात संपूर्ण कृषी फिडरकर रात्रीचे भारनियन होत असल्याने बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे त्यांमुळे महावितरण कंपनीने रात्रीच्या भारनियमचा हा खेळ त्वरित थांबवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

गेल्या तीन दिवसापासून नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये कृषी फीडरवर रात्रीचे भारनियमन केले जात असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाने या भारनियमानाची दखल घेवून जगाचा पोशिंदा म्हणून मिरवणाऱ्या शेतकरी राजाला न्याय देऊन हे रात्री भारनियमन बंद करावे अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

ताज्या बातम्या

त्यांना राजकीय आकांक्षा असण्यात काहीच गैर नाही, पण…; दीपके, दास अन्...

0
दिल्ली । Delhi दिल्लीतील जंतर-मंतरवर सलग २६ दिवस अन्नत्याग उपोषण करून केंद्र सरकारचे लक्ष वेधून घेणारे प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक सध्या एका...