Saturday, October 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजदुगारवाडी धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू

दुगारवाडी धबधब्यात बुडून युवकाचा मृत्यू

त्र्यंबकेश्वर | प्रतिनिधी Trimbakeshwar

- Advertisement -

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आलेल्या नाशिक येथील २० वर्षीय युवकाचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मयत युवकाचे नाव अभिजीत नवनाथ पवार (वय २०, रा. जेलरोड, नाशिकरोड) असे आहे. अभिजीत हा त्याचा मित्र प्रणव अविनाश खरे याच्यासोबत दुगारवाडी धबधबा येथे फिरण्यासाठी आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही धबधब्यात पाण्यात खेळत असताना अभिजीत याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात बुडाला. दुपारी साडेबारा वाजता वरील घटना घडली उपस्थितांनी तातडीने त्याला पाण्याबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक गावित, पोलीस हवालदार रुपेश मुळाणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवरे करीत आहेत.

ताज्या बातम्या