Wednesday, September 16, 2026
Homeब्रेकिंग न्यूजट्रकवर कार धडकली; चार जणांचा मृत्यू; सहा जण जखमी

ट्रकवर कार धडकली; चार जणांचा मृत्यू; सहा जण जखमी

मृतांमध्ये लहान मुलांचा समावेश

- Advertisement -

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

मुंबई- नाशिक महामार्गावर बुधवार दि. १६ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात झालेल्या मृतांमध्ये लहान मुलांचा आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगाव जवळ दोन वर्षांपूर्वी जळालेल्या उभ्या असलेल्या ट्रकला इर्टिगा कारने मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघातातील हे सर्व जोगेश्वरी येथील रहाणारे होते. देव दर्शनासाठी कुटुंबासह नाशिक व त्र्यंबकेश्वरला आले होते. देव दर्शन आटोपुन पुन्हा जोगेश्वरी कडे ( मुंबई ) जात असतांना परतीच्या प्रवासात आटगाव जवळ हा भीषण अपघात झाला असून अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून यात दोन लहान मुलाचा समावेश असून ६ जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वरचे दर्शन आटोपून हे कुटुंब मुंबईच्या दिशेने परतत होते. यादरम्यान मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूर तालुक्यातील आटगावजवळ एका जळालेल्या ट्रकला मागून तीव्र धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, वाहनाचा चेंदामेंदा झाला असून आतील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. या दुर्घटनेत चार जणांचा जागीच किंवा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

श्रीराम जैस्वाल, आयुष जैस्वाल, लाडो जैस्वाल, सुरज जैस्वाल या चौघांचाही मृत्यू झाला आहे. सुभी जैस्वाल शिवम जैस्वाल, हाशिक जैस्वाल, सुनीता जैस्वाल, राधिका जैस्वाल, सतीश जैस्वाल हे सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींवर शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

राज्याच्या महसूल वाढीसाठी वित्त समितीची स्थापना

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai सन २०३० पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवलेल्या राज्य सरकारने कर आणि बिगरकर महसुलात वाढ करण्यासाठी 'महाराष्ट्र शाश्वत...