Friday, October 2, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

आगामी राजकीय व संघटनात्मक तयारीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रस्तरीय महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि. १९) नाशिकमध्ये होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीकडे पक्षाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे.

बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेत आगामी राजकीय आव्हानांना सामोरे जाण्यासाठी पदाधिकारी व लोकप्रतिनिधींना दिशा दिली जाण्याची शक्यता आहे. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या ) मोहिमेसह बूथ पातळीवरील संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांची सक्रियता वाढविणे आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविणे या विषयांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी सुरू असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कुंभमेळ्याच्या कामांना गती देणे, पायाभूत सुविधांचा आढावा आणि विकासकामांबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. सिंहस्थाच्या तयारीतील संथगतीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची स्वतंत्र आढावा बैठकही १९ ऑगस्टला नियोजित आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अलीकडील बैठकीत कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा अधिक प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे नाशिकच्या बैठकीत पक्षाचा जनसंपर्क, डिजिटल प्रचार आणि संघटनात्मक विस्तार यावरही भर राहण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत आगामी काळातील भाजपची रणनीती निश्चित होण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष या बैठकीकडे लागले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेसाठी एकाच दिवशी 92 उमेदवारांचे 100 अर्ज दाखल!

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असून, गुरुवारी एकाच दिवशी 92 उमेदवारांनी 100 उमेदवारी अर्ज दाखल केले....