Saturday, October 10, 2026
Homeक्राईमNashik News: कचराकुंडीत ममता अन् तपासाची चाके थिजली! शहरात ९ वर्षांत बेवारस...

Nashik News: कचराकुंडीत ममता अन् तपासाची चाके थिजली! शहरात ९ वर्षांत बेवारस आढळली १९ मृत अर्भकं

नाशिक | प्रतिनिधी
जन्माला आल्या-आल्याच निष्पाप जीवांची अमानुषपणे विल्हेवाट लावून जन्म लपवण्याचा क्रूर प्रकार नाशिक शहरात सातत्याने समोर येत आहे. बुधवारी (दि. ७) पंचवटीतील गोदावरी नदीपात्रात गौरी पटांगणासमोर एका नवजात अर्भकाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने शहर पुन्हा एकदा सुन्न झाले आहे. गेल्या नऊ वर्षांत कचराकुंडी, सेप्टिक टैंक आणि मोकळ्या मैदानात एक-दोन नव्हे, तर तब्बल १९ मृत अर्भके बेवारस टाकल्याची माहिती उघडकीस आली आहे.

गेल्या नऊ वर्षांत दाखल झालेल्या या १९ गंभीर गुन्ह्यांमध्ये नाशिक पोलिसांच्या हाती अद्याप एकही संशयित लागलेला नाही. केवळ भारतीय न्याय संहिता बीएनएस ९४ तसेच भादंवि कलम ३१८ नुसार अज्ञात मातेविरुद्ध किंवा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हे नोंदवून तपासाचे सोपस्कार उरकले जात असल्याचे चित्र आहे. पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरी पटांगणासमोर गोदावरी नदीपात्रात ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी एका अज्ञाताने पुरुष जातीचे मृत नवजात अर्भक उघड्यावर नदीपात्रात फेकून दिले. जन्म लपवणे आणि मृत्यूनंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने हे अर्भक पाण्यात टाकल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रमेश नारायण देवरे (वय ५०) यांच्या फिर्यादीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ९४ अन्वये अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरे करत आहे.

- Advertisement -

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या निधनानंतर गोवा पोलिसांची मोठी कारवाई; ‘अननॅचरल डेथ’ची केली नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून होणार स्पष्ट

तपासाचे आव्हान
या सर्व १९ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असले तरी तपासात काहीच निष्पन्न होत नसल्याची माहिती आहे. घटनेनंतर गुन्हा नोंदवला जातो, मात्र सीसीटीव्ही फुटेज, परिसरातील रुग्णालये, प्रसूतीगृहांची तपासणी किंवा गुप्तहेरांचे नेटवर्क वापरण्यात अपयशी येत असल्याचे बोलले जात आहे. एकाही प्रकरणात जन्माची विल्हेवाट लावणाऱ्या संशयित मातेचा किंवा तिच्या नातेवाइकांचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. आयपीसी ३१८ आणि आता नव्या कायद्यानुसार बीएनएस ९४ अन्वये गुन्हे नोंदवून तपास फाइलींमध्येच बंद पडत असल्याचे दिसते.

आकडेवारीतून वास्तव

  • शहरात उघड्यावर, कचराकुंडीत वा सेप्टिक टैंकमध्ये अर्भके फेकून देण्याच्या विकृतीचा आलेख भयावह आहे.
  • सन २०१८ या एकाच वर्षात बेवारस स्थितीत फेकून दिलेली सर्वाधिक मृत ९ अर्भके आढळली होती.
  • २०१९ ते ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आणखी १० अर्भके निष्पापपणे मृत्यूच्या दाढेत धकललेली अथवा मृत अवस्थेत फेकून दिलेली आढळली.
  • एकूण ९ वर्षांत तब्बल १९ अर्भके बेवारस फेकून देण्यात आली

ताज्या बातम्या

Abhijeet Dipke : दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर CJP च्या आंदोलनाचे नेतृत्व...

0
मुंबई | Mumbai कॉकरोच जनता पार्टीकडून आज (दि.१० ऑक्टोबर) रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र,...