Saturday, October 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNana Patekar Death: नाना पाटेकरांच्या निधनानंतर गोवा पोलिसांची मोठी कारवाई; 'अननॅचरल डेथ'ची...

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या निधनानंतर गोवा पोलिसांची मोठी कारवाई; ‘अननॅचरल डेथ’ची केली नोंद, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून होणार स्पष्ट

पणजी | Panaji
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे ह्लदयविकाराने निधन झाले. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधानाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अत्यंत शिस्तप्रिय आयुष्य जगणाऱ्या अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये. डॉक्टरांच्या पथकाने तब्बल 45 मिनिटे नानांना सीपीआर दिला, पण त्यांना यश आले नाही. अखेर नाना पाटकेरांचा मृत्यू (Nana Patekar Death) झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. गुरुवारी, ८ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा पुण्यातील डोणजे गावातील त्यांच्या ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर त्यांच्यावर अंतिम संस्कार पार पडले. नानांचे सुपुत्र मल्हार पाटेकर यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आणि धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार विधी पार पाडले. नाना पाटेकर यांच्या अचानक निधनानंतर सगळ्यांनाच धक्का बसला. आता त्यांच्या मृत्यू प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे.

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या मृत्यूशी संबंधित कायदेशीर प्रक्रिया चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. गोवा पोलिसांनी या प्रकरणात ‘अननैचुरल डेथ’ म्हणजेच अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस रेकॉर्डनुसार, नाना पाटेकर यांना गोव्यातील डोना पाऊला येथील त्यांच्या घरातून रुग्णालयात आणले गेले होते, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. मात्र, ‘अनैसर्गिक मृत्यू’चा गुन्हा दाखल झाला म्हणजे त्यामागे कोणतीही कारस्थान किंवा कट-कारस्थान सिद्ध झाले आहे असे नाही.

- Advertisement -

संपादकीय : ९ ऑक्टोबर २०२६ – नटसम्राट

पणजी पोलिसांत BNSS कलम १९४ अंतर्गत नोंद
मिळालेल्या वृत्तानुसार, पणजी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) मधील कलम १९४ अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस उपनिरीक्षक नितीन नाईक यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी ही प्रक्रिया सुरू केली.

मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही त्यांना वाचवता आले नाही आणि सकाळी सुमारे ५:२० वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सुरुवातीला ‘कार्डियाक अरेस्ट’ची (हृदयविकाराचा झटका) शक्यता वर्तवली होती, तर मृत्यूच्या नेमक्या परिस्थितीची पुष्टी करण्यासाठी शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात आले.

Goa: Panaji Police registers an Unnatural Death (UD) case under Section 194 of the Bharatiya Nagarik Suraksha Sanhita (BNSS) following the death of veteran actor Vishwanath (Nana) Gajanan Patekar.

According to the police record, the 76-year-old actor was brought dead to the casualty ward of Manipal Hospital, Bambolim, from his residence at Ocean Park, Dona Paula. Further enquiry into the matter is currently in progress, led by PSI Nitin Naik.— ANI (@ANI) October 9, 2026

वृत्तानुसार, पोलीस तपासाचा एक भाग म्हणून नाना पाटेकर यांच्या कुटुंबातील सदस्यांचे, आणि इतर संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवले जाण्याची शक्यता आहे. तसेच, शवविच्छेदन अहवाल देखील मृत्यूचे मूळ कारण स्पष्ट करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. अचानक झालेल्या किंवा संशयास्पद वाटणाऱ्या परिस्थितीची योग्य चौकशी करण्यासाठी ‘अनैसर्गिक मृत्यू’चा गुन्हा नोंदवणे ही एक कायदेशीर प्रक्रिया असते, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

default-featured-image

Abhijeet Dipke : मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजीचे...

0
मुंबई | Mumbai कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी आज (दि.१० ऑक्टोबर) रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार...