मुंबई | Mumbai
कॉकरोच जनता पार्टीकडून आज (दि.१० ऑक्टोबर) रोजी दिल्लीच्या जंतरमंतरवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, या आंदोलनापूर्वी सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दीपके यांच्यासह सौरव दास (Sourav Das) आणि आशुतोष रांका (Ashutosh Ranka) या प्रमुख सहकाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी इंदिरा गांधी विमानतळावरून ताब्यात घेतले. त्यामुळे सीजेपीच्या आंदोलनाचे नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यानंतर आता दीपके यांनी
एक व्हिडीओ शेअर करत महत्त्वाची माहिती दिली आहे.
हे देखील वाचा : CJP Protest : मोठी बातमी! अभिजीत दीपके, सौरव दास अन् आशुतोष रांकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात; थेट विमानातूनच…
अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी दिल्लीतील (Delhi) आंदोलनाचे नेतृत्व ‘कॉकरोच जनता पार्टी’चे राष्ट्रीय संघटन सचिव अजिंक्य शिंदे हे करतील, अशी घोषणा केली. व्हिडिओमध्ये दीपकेंनी म्हटले की, “हॅलो एव्हरीवन. जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल, तर याचा अर्थ मी, आशु आणि सौरभ आम्ही तिघेही अटक झालो आहोत. आमच्यानंतर या मुव्हमेंटला अजिंक्य लीड करेल. तर तुम्ही जेवढेही हे व्हिडिओ पाहत आहात, कृपया अजिंक्य शिंदेंना फॉलो करा. आशुतोष, मी आणि सौरभनंतर ते ‘कॉकरोच जनता पार्टी’ पुढे चालवतील. धन्यवाद”, असे ते म्हणाले आहेत.
अजिंक्य शिंदे कोण आहेत?
महाराष्ट्रातील अलिबागचे रहिवासी असलेले अजिंक्य शिंदे (वय ३५) (Ajinkya Shinde) हे कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय संघटना प्रभारी म्हणून काम पाहात आहेत. ते अनेक वर्षांपासून अभिजीत दीपके यांच्या जवळचे सहकारी म्हणून सोबत असून, त्यांची पहिली भेट २०१६ मध्ये गोव्यात झाली होती.अजिंक्य शिंदे यांनी यापूर्वी महाराष्ट्र आणि गोव्यात’आम आदमी पार्टी’ पक्षाच्या युवा आघाडीचे संयोजक व सहप्रभारी म्हणून काम केले आहे. सध्या ते सीजेपीचे राष्ट्रीय संघटन प्रभारी म्हणून कार्यरत आहेत.
हे देखील वाचा : Abhijeet Dipke : मोठी बातमी! अभिजीत दीपकेंवर कोसळला दु:खाचा डोंगर; आजीचे दीर्घ आजाराने निधन



